Wednesday 13 April 2011

महाराष्ट्राचे किल्ले:



महाराष्ट्राचे किल्ले:

राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिन्हगड, प्रतापगड, पुरन्दर, लोहगड, पन्हाळा, सिन्धुदुर्ग, विजयदुर्ग,

जन्जिरा, विशालगड इ. किल्ले महाराष्ट्रात आहेत. नमुद केलेले किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजान्च्या हिन्दवी स्वराज्यात मिळविले/बान्धले होते. शिवरायान्चा जन्म शिवनेरी गडावर झाला. शिवरायान्नि प्रथम जिन्कलेला गड/किल्ला तोरणा होय. रायगड हि शिवरायान्चि पहिली राजधानी होती. राजगड हा किल्ला शिवरायान्नि स्वतः बान्धला. सिन्धुदुर्ग, विजयदुर्ग, जन्जिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रि हल्ल्यान्पासून स्वरानज्याचे रक्षण करत. पन्हाळा व विशालगड हे किल्ले कोल्हापुर जिल्हयात आहेत. राजगड, शिवनेरी, तोरणा, सिन्हगड, प्रतापगड, पुरन्दर, लोहगड हे किल्ले पुणे जिल्हयात आहेत. रायगड हा किल्ला रायगड जिल्हयात आहे. सिन्धुदुर्ग हा किल्ला सिन्धुदुर्ग जिल्हयात आहे.

Friday 8 April 2011

महाराष्ट्रातील कृषी संशोधन

  • महाराष्ट्रातील कृषी संशोधन: महाराष्ट्राती राहुरी,दापोली, अकोला आणि परभणी या कृषी विद्यापीठांनी कृषी संशोधन कार्यक्रम हाती घेतले आहे.उच्च बी-बियाणे, संकरित जाती, कोरड वही शेती तंत्रज्ञान, जलसिंचन वैगरे बाबतीत फार मोलाची भर घातली आहे.याचे स्वरूप पुढील प्रमाणे.
  • कडध्याण्याची उत्पनात भरीव वाढ होण्या साठी काही सुधारित जाती प्रसारित करण्या आल्या.यात प्रामुख्याने वाटण्याचे,बी.डी.एन.१व२,फुले जी. ५ व १२ आणि उडीत टी. ए. व्ही. ७ यांचा सामावेशे आहे. 
  • भू आणि जालसंधार्नासाठी जलविभाजक विकास तंत्रज्ञान अमलात आणलेले आहे.याचा फायदा सोलापूर आणि अकोला जिल्ह्यात पहावयास मिळतो.
  • कापसामधील लांब दाग्याचीअमेरिकन कापूस  सी.  ए. एच. ४४८ एन. एच.एच. ४४ व त्याचप्रमाणे देशी केलेल्या कापसाच्या उत्पादनात वाढ झालेली आहे.
  • भाजीपाल्याच्या बातमीतही भेंडी, वांगी आणि मिरचीच्या संकरीत जाती निर्माण केलेल्या आहेत. यामुळे यांचे उत्पादन वाढलेले आहे.  

Thursday 7 April 2011

*जलसिंचन

विहीर जलसिंचन: महाराष्ट्रात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या १९९५ च्या आकडेवारीनुसार ११ लाख ४३ हजार विहारी आहेत. त्या पैकी सुमारे १० लाख विहारींवर ऑईल इंजिन किंवा विद्युत पंप बसवले आहेत. महाराष्ट्रातील भूमिगत पाण्याच्या साठ्याचा अंदाज पाहतात आणखी ११ लाख ४३ हजार विहिरी खोदता येतील 

विहिरीं संख्यांची : एकून क्षेत्रान पैकी सुमारे ५६% क्षेत्र विहिरींच्या पाण्याने भिजविले जाते. महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरी अहमदनगर जिल्ह्यात (१,२६,२२७)आहेत. तर त्या खालोखाल नाशिक १,०७,६४६ व पुणे ८२,७९० जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
नागपूर विभागात विहारींची संख्या सर्वात कमी आहे 

विहिरीची घनता :दर १०० हेक्टरला विहिरीची संख्या किती असते त्यास 'विहारीची घनता' म्हणतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची घनता सांगली व सोलापूर मध्ये आहे. तर सर्वात कमी घनता मुंबई विभाग व बर्याच प्रमाणात नागपूर मध्ये आहे. 

Wednesday 6 April 2011

महाराष्ट्रतील वनस्पतीचे प्रमुख प्रकार

महाराष्ट्रातील वनस्पती:

१)  उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये : 

  प्रदेश:  महाराष्ट्रामध्ये कोकण भागात सह्याद्रीच्य पायथ्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी     परिसरात हि अरण्ये पहावयास मिळतात. वार्षिक पर्जन्य सुम्सरे २०० सें.मी किंवा त्याहीपेक्षा जास्त असणाऱ्या प्रदेशात व जांभ्या मृदेच्या भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये पहावयास मिळतात.
  वृक्षांचे स्वरूप: घनदाट वनस्पतीचे आच्छादन. उंची ४५ते६०मि. दरम्यान असते.
  वृक्षांचे प्रकार  :  नागचंपा,पांढरा सिडार,फणस,कावासी आदि.बांबू  आणि  कळाक विशेस

2)  उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी अरण्ये  :
  प्रदेश:   वार्षिक पर्जन्य २००से.मी पेक्ष्या कमी असणार्या प्रदेशात निम सदाहरित अरण्ये आढळतात.पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पत्ता पहावयास मिळतो.सह्त्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात  घातामाथ्यावारही काही वनस्पती आढळतात.आंबोली,लोणावळा,इगतपुरीच्या परिसरात हि वने आढळतात.  वृक्षांचे  स्वरूप:  सदाहरित वृक्षांपेक्षा कमी उंचीचे.वृक्षांचा पाने गाळण्याचा हंगाम वेगळा असतो.
 वृक्षांचे प्रकार:  किंदल,रंफानास,नाना,कदंब,शिसम,बिबाला तसेच बांबूची वने कमी प्रमाणात आदळतात.
3)  उपउष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये: 
प्रदेश :  सह्याद्री पर्वतावर २५०से.मी. पेक्षा जास्त पर्जन्य असणार्या प्रदेशात हि वनस्पती असते. महाबळेश्वर,पाचगणी, भीमाशंकर,माथेरान आणि गाविलगड टेकड्या मध्ये आदळतात.
वृक्षांचे स्वरूप:   पर्जन्याचे भरपूर प्रमाण,मध्यम स्वरूपाचे तापमान,दिर्काल पर्जन्य आणि आद्रता मुळे सदाहरित वृक्षे आहे.
वृक्षांचे प्रकार:  जांभळा,अंजन,हिरडा,आंबा,बेहडा,करवी.   

महाराष्ट्राची नदीप्रणाली

नद्यांच्या मार्गानुसार विभागणी :
१) दख्खनच्या पठाराव वायव्य-आग्नेय दिशेने वाहणाऱ्या नद्या
२) विदर्भातील उत्तर-दक्षिण दिशेने वाहणाऱ्या नद्या
३) उत्तर महाराष्ट्रात खानदेशात पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या
४) कोकण किनारपट्टीवरील पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या  नद्याब

नद्यांच्या जाल्विभाजाकानुसार प्रदेशाची विभागणी :
          महाराष्ट्र मध्ये सह्याद्री पर्वत व काही प्रमाणात सातपुडा पर्वतरांगातील टेकड्या प्रमुख जाल्विभाजक आहे. सह्याद्री पर्वतावरून द्खांच्या पठारावरून पूर्वेकडे  पसरलेल्या सातमाळा डोंगररांगा, हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगा आणि शंभूमहादेव डोंगररांगा या दुयाम जालविभाजाक आहेत.कारण सह्याद्री पर्वतातून उगम पावणाऱ्या मुख्य नद्यांना या डोंगरावरून वाहणाऱ्या उपनद्या येऊन मिळतात.