Wednesday 6 April 2011

महाराष्ट्रतील वनस्पतीचे प्रमुख प्रकार

महाराष्ट्रातील वनस्पती:

१)  उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये : 

  प्रदेश:  महाराष्ट्रामध्ये कोकण भागात सह्याद्रीच्य पायथ्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी     परिसरात हि अरण्ये पहावयास मिळतात. वार्षिक पर्जन्य सुम्सरे २०० सें.मी किंवा त्याहीपेक्षा जास्त असणाऱ्या प्रदेशात व जांभ्या मृदेच्या भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये पहावयास मिळतात.
  वृक्षांचे स्वरूप: घनदाट वनस्पतीचे आच्छादन. उंची ४५ते६०मि. दरम्यान असते.
  वृक्षांचे प्रकार  :  नागचंपा,पांढरा सिडार,फणस,कावासी आदि.बांबू  आणि  कळाक विशेस

2)  उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी अरण्ये  :
  प्रदेश:   वार्षिक पर्जन्य २००से.मी पेक्ष्या कमी असणार्या प्रदेशात निम सदाहरित अरण्ये आढळतात.पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पत्ता पहावयास मिळतो.सह्त्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात  घातामाथ्यावारही काही वनस्पती आढळतात.आंबोली,लोणावळा,इगतपुरीच्या परिसरात हि वने आढळतात.  वृक्षांचे  स्वरूप:  सदाहरित वृक्षांपेक्षा कमी उंचीचे.वृक्षांचा पाने गाळण्याचा हंगाम वेगळा असतो.
 वृक्षांचे प्रकार:  किंदल,रंफानास,नाना,कदंब,शिसम,बिबाला तसेच बांबूची वने कमी प्रमाणात आदळतात.
3)  उपउष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये: 
प्रदेश :  सह्याद्री पर्वतावर २५०से.मी. पेक्षा जास्त पर्जन्य असणार्या प्रदेशात हि वनस्पती असते. महाबळेश्वर,पाचगणी, भीमाशंकर,माथेरान आणि गाविलगड टेकड्या मध्ये आदळतात.
वृक्षांचे स्वरूप:   पर्जन्याचे भरपूर प्रमाण,मध्यम स्वरूपाचे तापमान,दिर्काल पर्जन्य आणि आद्रता मुळे सदाहरित वृक्षे आहे.
वृक्षांचे प्रकार:  जांभळा,अंजन,हिरडा,आंबा,बेहडा,करवी.   

No comments:

Post a Comment